कोणीतरी जेव्हा स्वतःशी बोलत असतो, तेव्हा ऐकणार्याला ते विसंगत वाटते.
आणि तरीही जवळजवळ प्रत्येकजण नियमितपणे स्वत:शी बोलत असतात.
मानसशास्त्रज्ञांचा अंदाज आहे कि, प्रौढांपैकी 95 टक्के पेक्षा जास्त जण असेकरतात.
लहान मुले खेळताना जवळजवळ नेहमीच स्वत:शी बोलत असतात.
त्यामुळे स्वत: बरोबर संभाषण करणे पूर्णपणे सामान्यपणाचे आहे.
हा संवादाचा फक्त एक विशेष प्रकार आहे.
आणि मधूनमधून स्वतःशी बोलण्याचे अनेक फायदे आहेत!
कारण हे कि आपण संवादाच्या माध्यमातून आपले विचार व्यवस्थापित करत असतो.
जेव्हा आपण स्वत:शी बोलत असतो तेव्हा आपले आतील आवाज उद्गत/उजेडात येत असतात.
तुम्ही असेही म्हणू शकता कि, त्याचे विचार मोठ्याने बाहेर येत आहेत.
बरेचदा विशिष्ट चर्चेमध्ये अत्यंत चंचल लोक स्वतःशीच बोलत असतात.
त्यांच्या बाबतीत, मेंदूचे विशिष्ट क्षेत्र कमी सक्रिय असते.
त्यामुळे ते कमी व्यवस्थापित असतात.
स्वत:शी बोलण्याने ते अधिक पद्धतशीर असण्यासाठी ते स्वत:ला मदत करत असतात.
स्वत:शी बोलणे हे आपल्याला निर्णय घेण्यासाठी देखील मदत करू शकते.
आणि तो तणाव घालवण्यासाठीचा अतिशय चांगला मार्ग आहे.
स्वत:शी बोलणे हे एकाग्रतेला प्रोत्साहन देते आणि तुम्हाला अधिक उपयुक्त बनविते.
कारण काहीतरी मोठ्याने बोलणे हे फक्त त्याविषयी विचार करण्यापेक्षा जास्तवेळ घेते.
आपण बोलत असताना आपल्या विचारांबद्दल अधिक जाणीवपूर्वक असतो.
स्वतःशी बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कठीण परीक्षा चांगल्याप्रकारे हाताळतो.
विविध प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे.
आपण स्वत:शी बोलण्याच्या माध्यमातून स्वतःला धैर्य देखील देऊ शकतो.
अनेक खेळाडू स्वत:ला प्रेरित करण्यासाठी स्वत:शी बोलत असतात.
दुर्दैवाने, आपण विशेषत: नकारात्मक परिस्थितीत स्वतःशी बोलत असतो.
त्यामुळे आपण नेहमीच सकारात्मक होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आणि आपण अनेकदा आपल्या काय इच्छा आहेत याचे पुनरावलोकन करायला हवे.
अशा प्रकारे आपण सकारात्मक बोलण्याच्या माध्यमातून आपल्या क्रियांचा प्रभाव टाकू शकतो.
परंतु दुर्दैवाने, आपण जेव्हा व्यावहारिक असतो केवळ तेव्हा ते काम करते!