ჩ-ენ არ ----ვს---რვ-ლ-.
ჩ___ ა_ გ_____ ს_______
ჩ-ე- ა- გ-ა-ვ- ს-რ-ი-ი-
-----------------------
ჩვენ არ გვაქვს სურვილი. 0 chve- ar --akv-----v--i.c____ a_ g_____ s_______c-v-n a- g-a-v- s-r-i-i-------------------------chven ar gvakvs survili.
आपण जे अनुभवतो आणि विचार करतो ते भाषेच्या साह्याने प्रकट करतो.
म्हणून आकलन हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
परंतु काहीवेळा प्रत्येकालाच समजायला हवे असे लोकांना वाटत नाही.
अशा बाबींसाठी, त्यांनी गुप्त भाषेचा शोध लावला.
हजारो वर्षांपासून गुप्त भाषेने लोकांना आकर्षित केले आहे.
ज्युलिउस सिझर (Julius Caesar) याच्याकडे त्याची स्वतःची गुप्त भाषा होती. उदाहरणार्थ,
तो त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक भागात सांकेतिक संदेश पाठवत असे.
पाठवलेले सांकेतिक संदेश वाचण्यास त्याचे शत्रू असमर्थ होते.
गुप्त भाषा म्हणजे दळणवळणाचे संरक्षण.
गुप्त भाषेच्या साह्याने आपण इतरांपासून स्वतःला वेगळे करू शकता.
आपण विशेष समूहामध्ये आहोत हे आपण दाखवून देतो.
आपण गुप्त भाषेचा उपयोग का करतो यासाठी खूप कारणे आहेत.
प्रेमी प्रेमपत्र नेहमी सांकेतिक भाषेत लिहितात.
याखेरीज विशिष्ट उच्च व्यावसायिक समूहात त्यांच्या स्वत:च्या सांकेतिक भाषा होत्या.
जादूगार, चोर आणि व्यापारी लोक यांच्यासाठी सांकेतिक भाषा होत्या.
परंतु सांकेतिक भाषांचा उपयोग प्रामुख्याने राजकीय उद्दिष्टासाठी होत होता.
जवळजवळ प्रत्येक युद्धाच्या वेळी सांकेतिक भाषा वापरल्या जात.
लष्कर आणि गुप्तवार्ता संघटना यांच्याकडे स्वतःचे सांकेतिक भाषा तज्ञ होते.
गुप्तलेखनशास्त्र हे संकेतनशास्त्र आहे.
आधुनिक संकेत गणितातील किचकट सूत्रावर आधारित आहेत.
परंतु त्यांचे विसंकेतन करणे खूप अवघड जाते.
सांकेतिक भाषेशिवाय आपले जीवन अकल्पनीय आहे.
सांकेतिक माहिती आज प्रत्येक ठिकाणी वापरली जाते.
क्रेडिट कार्ड आणि ईमेल - सर्व काही सांकेतिक भाषेवर कार्य करतात.
गमतीचा भाग म्हणजे, खासकरून लहान मुले सांकेतिक भाषेचा शोध लावतात.
आपल्या मित्राबरोबर गुप्त भाषेत संदेशांची देवाणघेवाण करण्यास त्यांना आवडते.
मुलांच्या विकासासाठीदेखील गुप्त भाषा उपयोगी ठरतात.
ते कल्पनाशक्ती आणि भाषेविषयीची जाणीव यांना प्रेरणा देतात.