मुले फार त्वरीत वाढतात.
आणि ते लवकर आत्मसात देखील करतात.
अद्याप त्यावर संशोधन करावयाचे आहे कि मुले किती लवकर आत्मसात करतात.
शिकण्याची प्रक्रिया आपोआप घडते.
मुलांना ते शिकत असतात तेव्हा लक्षात येत नाही.
तरीसुद्धा, दररोज ते अधिक सक्षम असतात.
हे देखील भाषेने स्पष्ट होते.
बाळे फक्त पहिल्या काही महिन्यांत रडतात.
काही महिन्यातच ते लहान शब्द म्हणू शकतात.
मग त्या शब्दांतून वाक्ये तयार होतात..
साहजिकच मुले त्यांची मूळ भाषा बोलायला लागतात.
दुर्दैवाने, तसं प्रौढांच्या बाबतीत घडत नाही.
त्यांना शिकण्यासाठी पुस्तके किंवा इतर साहित्य असणे आवश्यक आहे.
केवळ या प्रकारे ते व्याकरण नियम जाणून घेऊ शकतात, उदाहरणार्थ.
दुसरीकडे, लहान मुले व्याकरण चार महिन्याचे असतानाच शिकतात.
संशोधकांनी जर्मन बाळांना परदेशी व्याकरण नियम शिकवले.
असे करण्यासाठी, त्यांनी त्यांना मोठ्याने इटालियन वाक्य ऐकवले.
त्या वाक्यांमध्ये काही वाक्यरचना होत्या.
बाळांना सुमारे पंधरा मिनीटे योग्य वाक्ये ऐकवली.
त्यानंतर, वाक्ये पुन्हा बाळांना ऐकवली.
या वेळी मात्र, काही वाक्ये चुकीची होती.
बाळे वाक्ये ऐकत असताना, त्यांच्या मेंदूची चाचणी केली.
अशा प्रकारे मेंदू वाक्यांना कशी प्रतिक्रिया देतो हे संशोधक ओळखू शकले.
आणि बाळांनी वाक्यानुसार विविध स्तरांतल्या प्रक्रिया दर्शविल्या!
जरी ते नुकतेच शिकले असले तरी, त्यांनी चुका नोंदवल्या होत्या.
काही वाक्ये का चुकीचे आहेत हे स्वाभाविकच, बाळांना समजत नाही.
ते उच्चारविषयक नमुन्यांच्या दिशेने स्वतःला निर्देशित करतात.
पण एक भाषा जाणून घेण्यासाठी पुरेसे आहे - किमान बाळांना साठी तरी ...