მას ფ----კი არ-ჰ-ონდა, ა--------ლე--.
მ__ ფ___ კ_ ა_ ჰ______ ა_____ ვ______
მ-ს ფ-ლ- კ- ა- ჰ-ო-დ-, ა-ა-ე- ვ-ლ-ბ-.
-------------------------------------
მას ფული კი არ ჰქონდა, არამედ ვალები. 0 mas -u----'- ar --o---, ar-med-v---b-.m__ p___ k__ a_ h______ a_____ v______m-s p-l- k-i a- h-o-d-, a-a-e- v-l-b-.--------------------------------------mas puli k'i ar hkonda, aramed valebi.
एखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते.
लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात.
वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात.
वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात.
मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही.
परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो.
त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल.
या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे.
जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे.
लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते.
मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात.
ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात.
त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे.
मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे.
परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे.
तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे.
पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे.
जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते.
द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते.
त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे.
अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील.
लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते.
ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात.
अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते.
संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते.
लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते.
लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात.
तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...