वाक्प्रयोग पुस्तक

mr गप्पा १   »   th การสนทนา 1

२० [वीस]

गप्पा १

गप्पा १

20 [ยี่สิบ]

yêe-sìp

การสนทนา 1

[gan-sǒn-tá-na]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   

मातृभाषा? पितृ भाषा!

लहान असताना तुम्ही तुमची भाषा कोणाकडून शिकली? नक्कीच तुम्ही म्हणाल: आईकडून! जगातील बरेच लोक तसा विचार करतात. सर्वच राष्ट्रांमध्ये मातृभाषा हा शब्द प्रचलित आहे. इंग्रजी आणि चायनीज या भाषा यासोबत परिचित आहेत. कदाचित आई आपल्या पाल्याबरोबर अधिक वेळ व्यतीत करते म्हणून असे वाटत असेल. परंतु, अलीकडील संशोधन वेगळाच निष्कर्ष काढते. या संशोधनाप्रमाणे आपली भाषा ही आपल्या वडिलांची भाषा आहे. संशोधकांनी जनुकीय बाबी आणि मिश्र जमातींची भाषा या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. अशा जमातींमध्ये पालक वेगवेगळ्या संस्कृतीमधून असतात. या जमाती हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या होत्या. यासाठी मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हे मोठे कारण होते. या मिश्र जमातींच्या जनुकीय बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर त्याचे जमातींच्या भाषेशी तुलना करण्यात आली. बर्‍याच जमाती त्यांच्या पुरुष पूर्वजांच्या भाषा बोलतात. म्हणजेच, देशाची भाषा ही Y गुणसुत्रापासून आली आहे. म्हणून, माणसाने (पुरुष) त्यांच्याबरोबर परकीय देशांमध्ये त्यांची भाषा नेली. आणि तेथील महिलांनी पुरुषांची नवीन भाषा स्वीकारली. परंतु, आज देखील आपल्या भाषेवर वडिलांचा मोठा प्रभाव आहे. कारण, जेव्हा लहान मुले शिकत असतात तेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या भाषेकडे अभिमुख होतात. वडील त्यांच्या मुलांबरोबर तुलनेने कमी बोलतात. पुरुषांची वाक्यरचना ही स्त्रियांपेक्षा खूपच सोपी असते. यामुळेच वडिलांची भाषा ही लहान मुलांना योग्य असते. त्यांना कोणतेही ओझे वाटत नाही आणि भाषा शिकण्यास देखील सोपे जाते. म्हणून लहान मुले बोलताना आईची नक्कल न करता वडिलांची नक्कल करतात. नंतर, आईचा शब्दकोश मुलांच्या भाषेला आकार देतो. अशाप्रकारे, आई आणि वडील आपल्या भाषेवर परिणाम करतात. म्हणून यास पालकांची भाषा असे म्हणणे उत्तम राहील!