वाक्प्रयोग पुस्तक

mr क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २   »   ru Прошедшая форма модальных глаголов 2

८८ [अठ्ठ्याऐंशी]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २

88 [восемьдесят восемь]

88 [vosemʹdesyat vosemʹ]

Прошедшая форма модальных глаголов 2

Proshedshaya forma modalʹnykh glagolov 2

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   

विसरू नये याकरिता टीपा

शिकणे नेहमी सोपे आहे असे नाही. कितीही मजा असली तरीही, ते थकवणारे असू शकते. परंतु जेव्हा आपण काहीतरी शिकतो तेव्हा, आपण आनंदी असतो. आपल्याला आपल्या प्रगतीचा आणि स्वतःचा अभिमान वाटतो. दुर्दैवाने, आपण काय शिकलो हे विसरू शकतो. विशेषतः ही समस्या अनेकदा भाषेबाबत येऊ शकते. शाळेमध्ये आपल्या पैकी बरेच जन एक किंवा अनेक भाषा शिकतो. शाळेनंतर ते ज्ञान लक्षात राहत नाही. आता आपण महत्प्रयासाने एखादी भाषा बोलू शकतो. आपली मूळ भाषा आपल्या दैनंदिन जीवनावर जास्त प्रभाव टाकते. अनेक परकीय भाषा या सुटीमध्येच वापरल्या जातात. परंतु, ज्ञानाची जर उजळणी केली नाही तर ते लक्षात राहू शकत नाही. आपल्या मेंदूस व्यायाम हवा आहे. असे म्हणले जाऊ शकते की.तो एका स्नायू सारखे कार्य करतो. या स्नायूस जर व्यायाम मिळाला नाही तर ते कमकुवत होऊ शकते. परंतु, विसाळूपण टाळण्यासाठी अनेक मार्ग आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही शिकलात त्याचा वारंवार वापर करा. सातत्यपूर्ण कार्य इथे मदत करू शकेल. तुम्ही आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी एक छोटीशी दैनंदिन नित्यक्रम आखू शकता. उदाहरणार्थ, सोमवारी तुम्ही परकीय भाषेमध्ये पुस्तक वाचू शकता. बुधवारी परकीय भाषेतील रेडिओ वाहिनी ऐकू शकता. त्या नंतर शुक्रवारी तुम्ही परकीय भाषेमध्ये जर्नल लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वाचणे, ऐकणे आणि लिहिणे या क्रिया बदलू शकता. परिणामी, आपले ज्ञान विविध प्रकारे सक्रिय राहते. हा व्यायाम फार जास्त वेळ असण्याची गरज नाही अर्धा तास पुरेसा आहे. परंतु, तुम्ही नियमितपणे सराव करणे महत्वाचे आहे! संशोधन असे दर्शविते की आपण जे काही शिकतो ते आपल्या मेंदूमध्ये कित्येक दशके राहते. ते फक्त पुन्हा एकदा ड्रावरमधून बाहेर (सराव) काढणे महत्वाचे आहे.